Join us  

खूशखबर..! अवघ्या 312 रुपयांत करा 'गोएअर'ची हवाई सफर  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 10:08 PM

ठळक मुद्देहवाई सफर करणा-यांसाठी एक खूशखबरप्रवासासाठी सुरुवातीला फक्त 312 रुपये मोजावे लागणार बुकींग आजपासून (दि.24) ते 29 नोव्हेंबरपर्यंत

मुंबई : हवाई सफर करणा-यांसाठी एक खूशखबर आहे. गोएअर विमान कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक ऑफर आणली आहे. दिल्ली, कोच्ची आणि बंगळुरुसह सात शहरांसाठी ही ऑफर असून एकतर्फी प्रवासासाठी सुरुवातीला फक्त 312 रुपये मोजावे लागणार आहेत. यासाठी गोएअर विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या 312 रुपयांत प्रवास करण्यासाठी  बुकींग आजपासून (दि.24) ते 29 नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. दरम्यान, या ऑफरमध्ये तुम्ही बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक डिसेंबरपासून ते 28 ऑक्टोबर 2018 पर्यंत प्रवास करता प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे, या खास ऑफरमध्ये तिकीट बुकिंगवर लागणारा टॅक्स सुद्धा आकारला जाणार नाही. ही ऑफर फक्त नवी दिल्ली, कोच्ची, बंगळुरु, हैद्राबाद, अहमदाबाद आणि लखनऊ या शहरामध्ये एकतर्फी प्रवास करण्यासाठी आहे. तसेच, एकदा बुकींग केल्यानंतर तुम्हाला तिकीट रद्द करायचे असल्यास कॅशबॅक मिळणार नसल्याचे कंपनीने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे. दरम्यान, गेल्या ऑगस्ट महिन्यात इंडिगो एअरलाइन्स कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी अवघ्या 1,111 रुपयांत देशातंर्गत हवाई प्रवास करण्याची संधी दिली होती. विमान व्यवसायात इंडिगो एअरलाइन्स कंपनीला अकरा वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांसाठी ही विशेष ऑफर सुरु करण्यात आली होती.

टॅग्स :प्रवास