Join us
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर, उद्यापासून हार्बरवर १२ डब्यांच्या १४ लोकल धावणार

By admin | Updated: May 17, 2016 21:35 IST

हार्बरच्या प्रवाशांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे उद्यापासून १२ डब्यांच्या आणखी नव्या १४ लोकल गाड्या हार्बरवर धावणार आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १७ : दररोराज लोकल मधील वाढणारी गर्दी आणि होणारे अपघात यामुळे रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वेवर लोकलच्या डब्ब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.  हार्बर मार्गावरच्या वाढत्या गर्दीमुळे काही दिवसांपूर्वीच १२ डब्यांच्या लोकल सुरु करण्यात आल्या होत्या. आता हार्बरच्या प्रवाशांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे उद्यापासून १२ डब्यांच्या आणखी नव्या १४ लोकल गाड्या हार्बरवर धावणार आहेत. यापुर्वी, २९ एप्रिलपासून १२ डब्ब्याची लोकल हार्बरवर सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण २५ बारा डब्यांच्या लोकल आता हार्बरवर धावणार आहे.हार्बरवर १२ डब्यांच्या लोकलची मागणी अनेक वर्षापासून सुरु होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने हार्बर रेल्वे मार्गावर ७२ तासांचा मेगाब्लॉकही घेतला होता. डीसी टू एस विद्युतप्रवाह परिवर्तन झाल्यानंतर मध्य रेल्वेने १२ डब्यांची लोकल चालवण्याला प्राधान्य दिलं होतं.