Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयटी क्षेत्रात अच्छे दिन, १० लाख रोजगारनिर्मिती होणार - मुख्यमंत्री

By admin | Updated: June 16, 2015 14:12 IST

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरणाला मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली असून त्यामुळे १० लाख लोकांसाठी रोजगार निर्माण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरणाला मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली असून त्यामुळे १० लाख लोकांसाठी रोजगार निर्माण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक येईल, असेही ते म्हणाले. 
आयटी धोरणाचा भाग म्हणून अॅनिमेशन इंडस्ट्रीलाही प्राधान्य देण्यात येणार असून ज्या सिनेमांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक अॅनिमेशन असेल त्या सिनेमांना सूट मिळणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. अॅनिमेशनसाठी बॉलिवूड ही मोठी इंडस्ट्री असली तरी अद्यापही अनेकजण बंगलोर तसेच हैदराबादमध्ये अॅनिमेशनचे काम करण्यास पसंती देतात. मात्र या नव्या धोरणामुळे या क्षेत्रात महाराष्ट्रही पुढे राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.