Join us

सुवर्ण महोत्सवी मराठी विज्ञान अधिवेशन मुंबईत

By admin | Updated: December 10, 2014 00:40 IST

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणा:या मराठी विज्ञान अधिवेशनाचे पुढचे वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.

मुंबई : मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणा:या मराठी विज्ञान अधिवेशनाचे पुढचे वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मुंबईत अधिवेशन भरवून सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्याचा निर्णय अमरावती येथे झालेल्या अधिवेशनात घेण्यात आला.
एकोणपन्नासावे मराठी विज्ञान अधिवेशन हे 5 ते 7 डिसेंबर दरम्यान अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आमटे होते. 1973 सालापासून ते गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या आदिवासी भागात त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह करीत असलेल्या आरोग्यसेवा, शिक्षणकार्य व इतर सामाजिक कार्याबद्दलची माहिती त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली.  
या अधिवेशनात फेरोसिमेंटच्या टाक्या बांधून पाण्याची साठवण करणा:या जलवर्धिनी संस्थेचा, भाताच्या नऊ जाती शोधून काढणारे चंद्रपूरचे शेतकरी बाबाजी खोब्रागडे यांचा आणि अन्य सहा जणांचा सन्मान करण्यात आला. परिषदेने यंदाच्या वर्षापासून विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर उत्तम विज्ञान संशोधन करणा:या प्राध्यापकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा पुरस्कार ठेवला होता. पहिल्याच वर्षी हा पुरस्कार मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या प्रा.भालचंद्र भणगे यांना मिळाला. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आला ते प्रा.एम.एम. शर्मा यांच्या हस्तेच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
अधिवेशनात सुधारित शेतीवरील परिसंवादात सुधारित शेती, तिच्याकडून वाढती लोकसंख्या आणि बदलत्या हवामानामुळे काय आव्हाने आहेत यावर अ.पां. देशपांडे तर भाताच्या नऊ जाती कशा विकसित केल्या यावर दादाजी खोब्रागडे बोलले. नॅनोटेक्नॉलॉजी विषयावरचे कुतूहल शमवण्यासाठी पुण्याच्या आयङोर या संस्थेच्या प्रा. सुलभा कुलकर्णी यांनी  माहिती दिली. पुण्याजवळील खोडद येथील रेडिओ दुर्बिणीबद्दल तेथील शास्त्रज्ञ सुधीर फाकटकर यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी)