Join us

३७ लाख रुपयांचे सव्वा किलो सोने विमानतळावर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:57 IST

रियाधहून मुंबईला जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ९ डब्ल्यू ५१९ द्वारे आलेल्या युसूब खान या भारतीय नागरिकाकडून सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ किलो ३३५ ग्र्रॅमच्या सोन्यासह ताब्यात घेतले.

मुंबई : रियाधहून मुंबईला जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ९ डब्ल्यू ५१९ द्वारे आलेल्या युसूब खान या भारतीय नागरिकाकडून सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ किलो ३३५ ग्र्रॅमच्या सोन्यासह ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ३७ लाख १७ हजार ६१५ रुपये आहे. खानला अटक करण्यात आली आहे. त्याने हे सोने इस्त्रीमध्ये लपवून ठेवल्याचे आढळून आले. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री करण्यात आली.

टॅग्स :मुंबई