Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा भाव उतरला, 34 हजारांवरुन 30 हजार रुपये

By admin | Updated: November 12, 2016 13:42 IST

दोन दिवस तेजीत चालणारा सराफ व्यापा-यांचा व्यवसाय पुन्हा थंड झाला आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने 10 ग्रॅम सोने 30 हजार रुपयांना मिळत आहे.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 12 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. काळा पैसा हद्दपार करण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्यानंतर सोन्याच्या दरात मोठ्या वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. 
 
30 हजार रुपये 10 ग्रॅम मिळणारे सोन्याने अव्वाच्या सव्वा भाव गाठत थेट 34 हजार रुपयांपर्यंत उडी मारली. दोन दिवस तेजीत चालल्यानंतर सराफ व्यापा-यांचा व्यवसाय पुन्हा थंड झाला आहे. दोन दिवसांनी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने 10 ग्रॅम सोने 30 हजार रुपयांना मिळत आहे.
 
दिल्लीमध्ये आयकर विभागानं सराफ दुकानांवर टाकलेल्या धाडीमुळे सोने-चांदी व्यापा-यांनी धास्ती घेतल्याची माहिती समोर येत आहे. 
आणखी बातम्या
(पैसा पांढरा करण्यासाठी धनाढ्यांची सराफांकडे धाव)
 
दरम्यान, नोटबंदीचा निर्णय घेतल्यापासून अवैध व्यापार करणा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.  त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवैध व्यावसायिकांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी  50 हजार रुपयांच्या दराने 3 किलो सोने विकत असल्याची चर्चा देखील सुरू होती.