Join us

महाराष्ट्राच्या दियाचे सुवर्ण पदक

By admin | Updated: June 26, 2017 01:42 IST

महाराष्ट्राच्या दिया चितळेने चमकदार कामगिरी करताना मध्य विभाग राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या सब ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकावले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राच्या दिया चितळेने चमकदार कामगिरी करताना मध्य विभाग राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या सब ज्युनियर गटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी, प्रिथा वर्तीकर हिला मुलींच्या कॅडेट गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इंदोर येथील अभय प्रसाद बंदिस्त स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत दियाने अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या मुनमुन कुंडूचा सहज पराभव केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतर दियाने जबरद्स्त पुनरागमन केले. तीने सलग चार गेम जिंकताना ६-११, ११-८, ११-२, ११-४, ११-९ असे दिमाखदार जेतेपद पटकावले.दुसरीकडे, मुलींच्या कॅडेट गटात महाराष्ट्राच्या प्रिथाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अत्यंत चुरशीच्या सामन्यात प्रिथाला ११-९, १०-१२, ८-११, ११-६, ५-११, ११-६, ६-११ अशा पराभवासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.