मुंबई : श्री सिद्धिविनायकाच्या चरणी एका भाविकाने ७ लाख ६६ हजार किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. २ जुलै रोजी अर्पण केलेल्या १८ कॅरेटच्या या मुकुटाचे वजन ३८३.७२० ग्रॅम इतके आहे. मुकुट अर्पण करणाऱ्या या भक्ताने आपले नाव गुप्त ठेवले आहे. श्रीचरणी अर्पण करण्यात आलेल्या या मुकुटाची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे.सिद्धिविनायकाच्या चरणी भाविक नेहमीच मौल्यवान वस्तू अर्पण करत असतात. भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या आभूषणांचा गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी लिलावही केला जातो.
सिद्धिविनायकाच्या चरणी सात लाखांचा सोन्याचा मुकुट
By admin | Updated: July 6, 2017 06:55 IST