Join us

विद्यार्थिनींची सोनसाखळी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:07 IST

मुंबई : नालासोपारा येथे राहणारी १६ वर्षीय विद्यार्थिनी विलेपार्ले परिसरातून जात असताना, दुचाकीस्वाराने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ...

मुंबई : नालासोपारा येथे राहणारी १६ वर्षीय विद्यार्थिनी विलेपार्ले परिसरातून जात असताना, दुचाकीस्वाराने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात अनोळखी दुचाकीविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.........................

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : खासगी शिकवणी घेणाऱ्या विकास मिश्रा उर्फ गुड्डू याने रविवारी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत येणाऱ्या लहान भावाला समोसे आणण्यासाठी पाठविले. त्यानंतर घरात मुलगी एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. स्थानिक समाजसेविका महिलेला याबाबत समजताच त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मालवणी पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

.....

गाेरेगाव येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण

मुंबई : गोरेगाव परिसरातून ११ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याप्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा रविवारी नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार बांगुरनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

....