Join us

साखळीचोरांकडून सोन्या-चांदीचा ऐवज जप्त

By admin | Updated: July 5, 2014 03:41 IST

गेल्या काही महिन्यापासून नालासोपारा शहरात सोनसाखळी पळवणाऱ्या टोळीने हैदोस घातला होता

वसई : गेल्या काही महिन्यापासून नालासोपारा शहरात सोनसाखळी पळवणाऱ्या टोळीने हैदोस घातला होता. अनेक महिलांची मंगळसूत्रे खेचून पळून जाणाऱ्या या टोळीच्या मागावर नालासोपारा पोलीस होते. अखेर काल गुरुवारी त्यांना याप्रकरणी यश आले व त्यांनी २ तरूणांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ३ लाखाचे दागिने व चोरीच्यावेळी वापरलेली मोटरसायकल जप्त केली. गेल्या काही महिन्यापासून नालासोपारा पोलीस ठाणा हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने मोटरसायकलवरून येऊन जबरीने खेचून घेऊन जाणारी टोळी सक्रीय झाली होती. अनेक तक्रारी आल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी या टोळीला अटक करण्यासाठी पथक नेमले व या पथकाने मुन्ना हकीम शेख व कमलहसन शेख या दोघा भावांना नालासोपारा पूर्व भागातील मोरेगाव येथून अटक केली. यावेळी त्यांच्याकडे २ लाख ९५ हजार ७२० रू. किमतीचे सोन्याचे दागिने सापडले. (प्रतिनिधी)