Join us

अमित साटम यांच्या विरोधात कोर्टात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:47 IST

महापालिकेच्या ‘के’ पश्चिम विभागातील अभियंत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे आमदार अमित साटम अडचणीत आले आहेत

मुंबई : महापालिकेच्या ‘के’ पश्चिम विभागातील अभियंत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे आमदार अमित साटम अडचणीत आले आहेत. या प्रकरणात राजकीय पक्षही आक्रमक झाले असून अभियंता वर्गातही तीव्र नाराजी पसरली आहे. अभियंत्यांना नेहमीच लक्ष्य केले जात असल्याने अभियंत्यांच्या संघटनेने न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे.अमित साटम भाजपाचे आमदार आहेत. गेल्या वर्षीही सप्टेंबर महिन्यात त्यांच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात फेरीवाल्यांनी लेखी तक्रार केली होती. हप्ता न दिल्यास स्टॉल्स हटविण्याची धमकी साटम यांची माणसे देत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल झालेल्या आॅडिओमुळे साटम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘के’ पश्चिम विभागातील एका अभियंत्याला दूरध्वनीवरून शिवीगाळ करण्याच्या या आॅडिओने महापालिकेतही खळबळ उडाली आहे.माफी मागाही पद्धत योग्य नाही. अधिकारी कायद्याच्या कक्षेत काम करीत असतो. त्याचे असे खच्चीकरण करू नये, हा आॅडिओ जर त्यांचाच असेल तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याची माफी मागावी.- यशवंत जाधव, सभागृह नेतेएफआयआर कराअमित साटमने शिवीगाळ करण्याची ही पहिली वेळ नाही. भाजपा आमदारांना सत्तेची मस्ती चढली आहे. आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून साटम यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा.- रवी राजा, विरोधी पक्षनेतेन्यायालयात जाणारही गंभीर बाब आहे. सरकारी अधिकाºयाला अशी शिवीगाळ योग्य नाही. याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार तसेच न्यायालयातही दाद मागणार आहे. साटम यांच्यावर कारवाई होऊन त्यांना अटक झालीच पाहिजे. २ एप्रिल रोजी यावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.- प्रकाश देवदास, नेते, मनपा कर्मचारी महासंघ, समन्वयक, पालिका संघटना कृती समिती