Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:06 IST

लता मंगेशकर; पालिकेच्या जम्बाे काेविड रुग्णालयातील कामाचे कौतुकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपण महाराष्ट्रासाठी, दिवस-रात्र काम करीत आहात. ...

लता मंगेशकर; पालिकेच्या जम्बाे काेविड रुग्णालयातील कामाचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपण महाराष्ट्रासाठी, दिवस-रात्र काम करीत आहात. ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते; असे म्हणत भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुंबई महापालिकेच्या जम्बाे कोविड रुग्णालयाच्या कामाचे कौतुक केले. हे कौतुक केवळ शाब्दिक नसून दीदींनी स्वहस्ताक्षरात वांद्रे-कुर्ला कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश डेरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेने ज्या पद्धतीने कोरोनाशी लढा दिला आहे आणि देत आहे, त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या पत्रात दीदींनी नमूद केले आहे की, आपण महाराष्ट्रासाठी, दिवस-रात्र काम करीत आहात. ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते.

या पत्रामुळे कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा करण्याचे बळ मिळाले आहे, अशी भावना डेरे यांनी व्यक्त करीत दीदींचे आभार मानले. वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बाे कोविड रुग्णालयामध्ये आजवर २२ हजार बाधितांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. २ लाख ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. १८ मे २०२० रोजी एमएमआरडीएने उभारलेल्या या कोविड रुग्णालयाचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले होते, तेव्हापासून रुग्णालयाचा काेराेनाविराेधातील लढा अव्याहतपणे सुरू आहे.

...............................................