ठाणे : सोमवारच्या बकरी ईदनिमित्ताने ठाणे, कल्याण, भिवंडी, भार्इंदरसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दुर्गाडी किल्ल्यावरील निदर्शनाची घटना वगळता जिल्ह्यात इतरत्र शांततेत ईद साजरी झाली.शहरात राबोडी, इंदिरानगर, हाजुरी परिसरात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून ईद साजरी केली. ईदनिमित्त अनेक ठिकाणी भरलेल्या बाजारपेठांमध्ये विविध वस्तू खरेदीचा आनंद महिलांनी लुटला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही उमेदवारांनीही मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दुर्गाडी किल्ल्यावर ईद साजरीऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मुख्य नमाज पढून मुस्लिम बांधवांनी आज ईदच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या वेळी किल्ल्यावरील दुर्गादेवीच्या मंदिरात आरतीसाठी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५० निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
बकरी ईद सर्वत्र उत्साहात
By admin | Updated: October 7, 2014 00:23 IST