Join us  

Goa: सनबर्नमधून ८२ लाख रुपये किमतीच्या पासांची चोरी  

By काशिराम म्हांबरे | Published: December 29, 2023 3:11 PM

Goa Crime News: देशी विदेशी पर्यटकां सोबत स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरणारे हणजूण- वागातोर येथे सनबर्न या संगीत महोत्सवातून ८२ लाख ५० हजार रुपयांचे पास चोरल्या प्रकरणी ५ कर्मचा-यां विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

- काशिराम म्हांबरेम्हापसा - देशी विदेशी पर्यटकां सोबत स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरणारे हणजूण- वागातोर येथे सनबर्न या संगीत महोत्सवातून ८२ लाख ५० हजार रुपयांचे पास चोरल्या प्रकरणी ५ कर्मचा-यां विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरलेले५० लाख रुपये किमतीचे पास पोलिसांनी वसूल केलेआहेत.

उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सनबर्नचे सह-संयोजक अरविंद कुमार यांनी या प्रकरणात ५ कर्मचाºयां विरोधात हणजूण पोलीस स्थानकावर लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत या कर्मचाºयांनी ८२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ६०० पास चोरल्याचे म्हटले होते. केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवम च्यारी, महेश गावस, मंजित गांवस, यासिन मुल्ला तसेच सिद्धगौडा अन्निनाल या संशयिता विरोधात आयपीसीच्या कलम ३८१ अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली होती.

अटक केलेल्या ५ संशयितांची चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरलेले ५० लाख रुपये किमतीचे पास वसूल करण्यात आलेआहे. या प्रकरणात पुढील तपास निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान काल गुरुवार २८ डिसेंबर पासून सनबर्नला आरंभ झाला आहे. तीन दिवसीय महोत्सवाचा उद्या ३० रोजी शेवटचा दिवस आहे. कालच्या पहिल्या दिवशी ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव पोलिसांनी कारवाईकरीत एका स्टेजवरील संगीत बंद पाडले.  उपअधिक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. आवाजासाठी निश्चीत करण्यात आलेली ६५ ते ७५ डेसिबल मर्यादेचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे उपअधीक्षक जिवबा दळवी म्हणाले. बंद केलेल्या स्टेवरील संगीत कार्यक्रम आज निश्चीत केलेल्या मर्यादेतून पुन्हा सुरु केले जाणार आहे.

टॅग्स :गोवासनबर्न फेस्टिव्हलगुन्हेगारी