Join us

समाज संघटित करणाऱ्या दूतांचा गौरव

By admin | Updated: November 8, 2016 05:07 IST

कठीण परिस्थितीशी झगडत समाजाच्या विकासाठी काम करणाऱ्या सर्वसामान्यांतील असान्यांना सोमवारी जमनालाल बजाज पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुंबई : कठीण परिस्थितीशी झगडत समाजाच्या विकासाठी काम करणाऱ्या सर्वसामान्यांतील असान्यांना सोमवारी जमनालाल बजाज पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदाचा ३९ वा जमनालाल पुरस्कार वितरण सोहळा एनसीपीएच्या जमशेट भाभा सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला. जमनालाल बजाज फाऊंडेशनतर्फे जमनालाल बजाज यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधत जमनालाल बजाज पुरस्कार दिला जातो. वेगवेगळ््या क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सोमवारी या पुरस्काराचे मोठ्या थाटात वितरण झाले. यंदा हा पुरस्कार मोहन हिराबाई हिरालाल, बोनबेहरी निमकर, डॉ. एन मंगा देवी, शेख रसीद घनौची यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहन हिरालाल यांना त्यांच्या गडचिरोलीतील उत्कृष्ट कामाबद्दल गौरविण्यात आले. हिरालाल यांनी त्यांचे संबंध आयुष्य येथील नागरिकांच्या प्रगतीसाठी वाहिले. येथील नागरिकांमध्ये सक्षम बनविण्याचे काम त्यांनी केले. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीवर ग्रामीण लोकसंख्या अवलंबून आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शेती तंत्राचा उपयोग व्हावा, यासाठी बोनबेहरी निमकर यांनी शेती संशोधन संस्थेची स्थापना करत शेतीत अमूलाग्र बदल घडवला. त्यांना ग्रामीण संशोधन क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या आंध्रपदेशच्या डॉ. एन. मंंगा देवी यांना महिला बाल कल्याण क्षेत्रातील प्रशंसनीय कामगिरी बद्दल गौरविण्यात आले. तर महात्मा गांधीच्या अमूल्य विचारांचा प्रसार करणाऱ्या शेख रसीद घनौची यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी जमनालाल बजाज फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल बजाज, निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)