मुंबई : मराठीतील उत्कृष्ट वा्मय निर्मितीसाठी राज्य शासनातर्फे दिल्या जाणा:या यंदाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वा्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये श्रीकांत देशमुख, प्रतिभा रानडे, डॉ. शोभा नाईक, के. रं. शिरवाडकर, तंबी दुराई आदींचा समावेश आहे.
प्रौढ वाड्.मयातील काव्य प्रकारासाठीचा कवी केशवसुत पुरस्कार श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावें ते आम्ही’ या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. अन्य पुरस्कार याप्रमाणो (वा्मय प्रकार, पुरस्काराचे नाव, विजेते लेखक आणि कंसात पुस्तकाचे नाव)
प्रथम प्रकाशन काव्य-बहिणाबाई चौधरी पुरस्कार - केशव खटींग (सालोसाल), प्रौढ वाड्.मय नाटक/एकांकिका - राम गणोश गडकरी पुरस्कार - मयूर देवल (कालिदास एका गुरख्याचे महाकाव्य), प्रथम प्रकाशन नाटक / एकांकिका - विजय तेंडुलकर पुरस्कार (शिफारस नाही), प्रौढ वा्मय -कादंबरी - हरी नारायण आपटे पुरस्कार - विश्रम गुप्ते (ईश्वर डॉट कॉम), प्रथम प्रकाशन कादंबरी - श्री. ना. पेंडसे पुरस्कार (शिफारस नाही), प्रौढ वा्मय - लघुकथा - दिवाकर कृष्ण पुरस्कार - सतीश तांबे (मॉलमध्ये मंगोल), प्रथम प्रकाशन लघुकथा - ग. ल. ठोकळ पुरस्कार - विभावरी वाकडे (बिननात्याचा माणूस), प्रौढ वा्मय ललितगद्य - अनंत काणोकर पुरस्कार - मुकुंद कुळे (लोकरहाटी), प्रथम प्रकाशन- ललितगद्य-ताराबाई शिंदे पुरस्कार - शुभांगी गोखले (रावा), प्रौढ वा्मय - विनोद- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार- तंबी दुराई (दोन फुल एक हाफ-भाग 2), प्रौढ वा्मय - चरित्न - न. चिं. केळकर पुरस्कार- प्रतिभा रानडे (ज्ञानकोशकार गणोश रंगो भिडे), प्रौढ वा्मय - आत्मचरित्न- लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार- सुप्रिया दीक्षित (अमलताश), प्रौढ वा्मय -समीक्षा/संशोधन/सौदयर्शास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन-
श्री. के. क्षीरसागर पुरस्कार- डॉ. शोभा नाईक (मराठी-कन्नड सांस्कृतिक सहसंबध), प्रथम प्रकाशन-समीक्षा/ सौंदयर्शास्त्र- रा. भा. पाटणकर पुरस्कार (शिफारस नाही), प्रौढ वा्मय - राज्यशास्त्न/ समाजशास्त्न- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - (प्रकाश पवार) भारतीय राजकारण आणि नेतृत्वाची वाटचाल, प्रौढ वा्मय - इतिहास- शाहू महाराज पुरस्कार - गणोश मतकर (होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास), प्रौढ वा्मय भाषाशास्त्न/ व्याकरण- नरहर कुरुंदकर पुरस्कार (शिफारस नाही), प्रौढ वा्मय - विज्ञान व तंत्नज्ञान (संगणक व इंटरनेटसह)- महात्मा जोतीराव फुले पुरस्का - राजा पटवर्धन (जैतापूरचे अणुमंथन), प्रौढ वा्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन- वसंतराव नाईक पुरस्कार- डॉ. तानाजीराव चोरगे (शेतीपूरक उद्योग), प्रौढ वा्मय - दलित साहित्य- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार- ल. सि. जाधव (सुंभ आणि पीळ), प्रौढ वा्मय - अथर्शास्त्न व अथर्शास्त्न विषयक लेखन- सी. डी. देशमुख पुरस्कार (शिफारस नाही), प्रौढ वा्मय - तत्त्वज्ञान व मानसशास्त्न- ना. गो. नांदापूरकर पुरस्कार - के.रं. शिरवाडकर (संस्कृती, समाज आणि साहित्य), प्रौढ वा्मय -शिक्षणशास्त्न - कमर्वीर भाऊराव पाटील पुरस्कार- डॉ. शैलजा मंडले (विमुक्त व भटक्यांची सद्य:स्थिती आणि उपाययोजना), प्रौढ वा्मय -पर्यावरण- डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार- मुकुंद धाराशिवकर (पाणी: तुमचे-आमचे), प्रौढ वा्मय -संपादित/ आधारित- रा.ना. चव्हाण पुरस्कार- अरुण जाखडे (भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण महाराष्ट्र), प्रौढ वा्मय - अनुवादित - तकतीर्थ लक्ष्मणशास्त्नी जोशी पुरस्कार-नीलिमा भावे- (पथेर पांचाली), प्रौढ वा्मय -संकीर्ण (क्रीडासह)- भाई माधवराव बागल पुरस्कार - सदानंद सिनगारे (संधिकाली या अशा..)
(प्रतिनिधी)
बालवा्मय - कविता - बालकवी पुरस्कार- आबा गोविंदा महाजन (मन्हा मामाना गावले जाऊ), बालवा्मय - नाटक व एकांकिका - भा.रा.भागवत पुरस्कार - डॉ. पूजा आकोटकर (बंडी ते बुंग), बालवा्मय - कादंबरी- साने गुरुजी पुरस्कार - बबन मिंडे (कॅप्टन कावेरी मंगळावर),
बालवा्मय - कथा (छोटय़ा गोष्टी, परीकथा, लोककथांसह)- राजा मंगळवेढेकर पुरस्कार-वर्षा गजेंद्रगडकर (खजिना लोककथांचा), बालवा्मय - सवर्सामान्य ज्ञान (छंद व शास्त्ने)- यदुनाथ थत्ते पुरस्कार- रमेश महाले (चला अंतराळात),
बालवा्मय - संकीर्ण - ना.धो. ताम्हणकर पुरस्कार - डॉ. भाग्यश्री पाटसकर (गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला), सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार- सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार - गोपाळराव मयेकर (ज्ञानदेव सृष्टी)