Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचे पैसे आठ दिवसांत द्या

By admin | Updated: May 17, 2015 01:59 IST

मंजूर पीक विम्याची रक्कम आठ दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अथवा आंदोलन केले जाईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

अन्यथा आंदोलनाचा धनंजय मुंडे यांचा इशारामुंबई : मंजूर पीक विम्याची रक्कम आठ दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अथवा आंदोलन केले जाईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.राज्यातील शेतकरी दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसामुळे त्रस्त झाला आहे. त्यांना जाहीर केलेली मदत अद्यापही मिळालेली नाही. खरिपांच्या पेरण्यांना १५ दिवसांत सुरुवात होईल. अशावेळी पेरणीसाठी मदत होणे आवश्यक आहे. सरकारने संकटसमयी शेतकऱ्यांना मदत तर केलीच नाहीच; किमान आता मंजूर झालेल्या पीक विम्याची रक्कम तरी आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याच्या दृष्टीने पावले उचला. जेणेकरून खरिपाच्या पेरणीसाठी मदत होऊ शकेल, असे ते म्हणाले.