Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉक्टरांच्या संपात बळी गेलेल्यांची माहिती द्या’

By admin | Updated: July 24, 2014 02:30 IST

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामध्ये उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला दिल़े

मुंबई :  जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामध्ये उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला दिल़े
याप्रकरणी अॅड़ गुणरत्न सदावर्ते यांनी जनहित याचिका केली आह़े या संपात बळी गेलेल्यांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई द्यावी व याची रक्कम डॉक्टरांकडूनच वसूल करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े न्या़ नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात राज्य शासनाने संपात सहभागी झालेल्या 6क्क् डॉक्टरांना बडतर्फ केल्याची माहिती न्यायालयाला दिली़ मात्र डॉक्टरांना केवळ बडतर्फ करून यावर शासन पडदा टाकत आह़े या संपात निष्पाप लोकांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने नाहक बळी गेला आह़े भविष्यात असे घडू नये यासाठी संपकरी डॉक्टरांकडूनच नुकसानभरपाईची रक्कम वसूल करावी, अशी मागणी अॅड़ सदावर्ते यांनी केली़ त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश दिल़े तसेच वारंवारच्या या संपांना सामोरे जाण्यासाठी ठोस तोडगा शासनाने काढायला हवा, असे मतही न्यायालयाने व्यक्त केल़े  (प्रतिनिधी)