मुंबई : पालिका भविष्यामध्ये नागरिकांना स्वस्त घरे देणार असेल तर महापालिकेच्या सर्व कामगारांना मोफत घरे देण्याची मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनने केली आहे.साफसफाई खात्यामध्ये २८ हजार कामगार काम करीत असताना फक्त ६ हजार कामगारांनाच घरे दिलेली आहेत. सफाई कामगारांना घरे देण्यासाठी २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १६४० कोटींची तरतूद केलेली होती. परंतु, आजच्या तारखेपर्यंत एकही इमारत बांधण्यात आली नसल्याचा आरोप म्युनिसिपल मजदूर युनियनचे साहाय्यक अशोक जाधव यांनी केला आहे. जे कामगार घाणीमध्ये काम करून टीबी, कर्करोग या आजारांनी मरतात त्यांना प्रशासन घरे देत नाही. मात्र अनधिकृत झोपड्या बांधणाऱ्या नागरिकांना मोफत घरे देण्यात येत असल्याचा आरोप युनियनचे सरचिटणीस अॅड. महाबळ शेट्टी यांनी केला आहे.
‘पालिका कामगारांना मोफत घरे द्या’
By admin | Updated: May 1, 2016 01:34 IST