Join us

कागदपत्रे द्या आॅनलाइन

By admin | Updated: July 29, 2015 02:13 IST

म्हाडामार्फत मे महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीत विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्याबाबतचे सूचना पत्रक पाठविण्यास सुरुवात झाली आहे

मुंबई : म्हाडामार्फत मे महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीत विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्याबाबतचे सूचना पत्रक पाठविण्यास सुरुवात झाली आहे. विजेत्यांना ५ आॅगस्टपासून आॅनलाइन कागदपत्रे सादर करता येणार असल्याचे, म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.म्हाडाच्या संकेतस्थळावरही आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात येणार असून, विजेत्यांना ७ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइनद्वारे कागदपत्रे सादर करता येतील. तसेच ‘पोस्ट लॉटरी सॉफ्टवेअर’बाबत विजेत्यांना माहिती देण्यासाठी म्हाडामार्फत एक शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.