Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दोन दिवसांत पीडितांना भरपाई द्या’

By admin | Updated: September 16, 2014 02:51 IST

बॉम्बस्फोटात बळी गेलेल्या ठाणो येथील नागरिकांच्या नातलगांसह इतर पीडितांना येत्या दोन दिवसांत नुकसानभरपाई द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिल़े

मुंबई : दादर, झवेरी बाझार व ऑपेरा हाउस येथे 2क्11 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात बळी गेलेल्या ठाणो येथील नागरिकांच्या नातलगांसह इतर पीडितांना येत्या दोन दिवसांत नुकसानभरपाई द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिल़े
झवेरी बाझार येथील बॉम्बस्फोटात ठाणो येथील चौघांचा बळी गेला़ केंद्र शासनाने या स्फोटातील पीडितांना 3 लाख रुपयांची मदत जाहीर केली व ही रक्कम देण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवली़ त्यानुसार ठाणो जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केला असता त्यांनी आपल्यावर ही जबाबदारी सोपवली नसल्याचे सांगितल़े त्यामुळे शासनाला ही नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रकाश सेठ यांनी दाखल केली आह़े  (प्रतिनिधी)
 
न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिल़े तसेच या पीडितांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश गेल्या महिन्यात याच खंडपीठाने दिले होत़े त्याची अंमलबजावणी न झाल्याने न्यायालयाने मुख्य सचिव यांनाही न्यायालयाच्या अवमानतेची नोटीस जारी केली़