Join us
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या कारमध्ये तरुणीचा विनयभंग

By admin | Updated: December 11, 2014 02:17 IST

मोटार ड्रायव्हिंग स्कूलमधील प्रशिक्षकाने एकांताचा फायदा घेत चालत्या गाडीत 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. यामुळे भेदरलेल्या तरुणीने चालू गाडीतून उडी मारून तरुणीने आपली सुटका करून घेतली.

प्रशिक्षकाला अटक : ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीतून उडी मारून तरुणीने केली सुटका
मनीषा म्हात्रे - मुंबई
मोटार ड्रायव्हिंग स्कूलमधील प्रशिक्षकाने एकांताचा फायदा घेत चालत्या गाडीत 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. यामुळे भेदरलेल्या तरुणीने चालू गाडीतून उडी मारून तरुणीने आपली सुटका करून घेतली. शनिवारी दुपारी मुलुंड पूर्वेकडील संभाजी मैदान ते नीलमनगर परिसरात हा प्रकार घडला.
या प्रकरणी नवघर पोलिसांनी मुलुंड पूर्वेकडील 9क् फूट रोड येथील गीअर अप मोटार ट्रेनिंग स्कूलचा आरोपी चालक प्रकाश तुकाराम रोकडे (47) याला अटक केली. या गुन्ह्यातला आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक रामदास मोरे यांनी दिली.
आठवडाभरापासून ही तरुणी मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये जात होती. दुपारी 2क् मिनिटांचे प्रशिक्षण तिला मिळत होते. प्रत्येक दिवशी रोकडे तिच्यासोबत प्रशिक्षक म्हणून गाडीत असे. घटनेच्या दोन दिवस आधीपासूनच रोकडेने या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न चालविला होता. मुलुंडमध्ये खूप ट्रॅफिक असते, आपण बॅण्ड स्टॅण्डला जाऊ या का, असे तो तिला सारखे विचारी. मात्र तरुणी त्याची मागणी उडवून लावत असे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास तरुणी गीअर अप स्कूलच्या गाडीत असताना रोकडेने पुन्हा बॅण्ड स्टॅण्डचा विषय काढला. तरुणीने त्यास नकार देताच रोकडेने गाडी संभाजी मैदान, नीलम नगर येथील निर्जन ठिकाणी नेली. तेथे रोकडेने या तरुणीसोबत चालत्या गाडीतच अश्लील चाळे सुरू केले. अचानक हल्ल्याने तरुणी भेदरली. मात्र गाडीचा वेग कमी होताच तिने उडी मारली आणि दडून बसली. रोकडेही तेथून पसार झाला. लागलीच तरुणीने भावाला बोलावून घेतले. पुढे दोघांनी नवघर पोलीस ठाणो गाठून तक्रार दिली. चालत्या गाडीतून उडी मारल्याने तरुणीला दुखापत झाली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून शनिवारी रोकडेला अटक केली. (प्रतिनिधी) 
 
स्कूलने पाश्र्वभूमी तपासली होती का?
नवघर पोलीस रोकडेच्या पाश्र्वभूमीची झाडाझडती घेत आहेत. तसेच गीअर अप स्कूलने नोकरीवर ठेवण्याआधी रोकडेची पाश्र्वभूमी तपासून पाहिली होती का किंवा आजवर स्कूलमध्ये आलेल्या महिला-तरुणींनी रोकडेविरोधात तक्रारी केल्या होत्या का, हेही तपासून पाहात आहेत.
पुन्हा ट्रेनिंग स्कूल नाही..
या घटनेने तरुणीला जबर धक्का बसला आहे. भविष्यात मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये जाणार नाही, असे तिने ठरविले आहे.
झाडाझडती अनिवार्य
ड्रायव्हिंग स्कूलमध्ये महिलावर्ग मोठय़ा प्रमाणात प्रशिक्षण घेतो. अनेकदा अखेरीस गाडीत महिला व प्रशिक्षक असे दोघेच उरतात. या क्षणी महिलांविरोधातील गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने शहरातील तमाम मोटार ट्रेनिंग स्कूलच्या प्रशिक्षकांचीही पाश्र्वभूमी पडताळण्याची आवश्यकता आहे.