Join us

भररस्त्यात तरुणीचा विनयभंग

By admin | Updated: January 31, 2016 01:56 IST

भररस्त्यात महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना साठेनगर, वागळे इस्टेट परिसरात घडली. याप्रकरणी एका रोडरोमिओला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे : भररस्त्यात महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना साठेनगर, वागळे इस्टेट परिसरात घडली. याप्रकरणी एका रोडरोमिओला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट, इंदिरानगर येथील १९ वर्षीय तरुणी आपल्या मैत्रिणीसह शुक्रवारी महाविद्यालयात जात होती. याचदरम्यान, हाजुरीत राहणारा जमीर नूर इस्लाम शेख याने गाडी घेऊन येत तिचा भररस्त्यात विनयभंग केला. याप्रकरणी तरुणीने तक्रार नोंदवल्यानंतर त्याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.जी. तुंगेनवार करीत आहेत. (प्रतिनिधी)