मुंबई : सातमजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून, एका २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. बुधवारी संध्याकाळी हा प्रकार साकीनाका परिसरात घडला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.साकीनाक्यातील चांदीवलीच्या संघर्षनगर परिसरात हा प्रकार घडला. साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा लालजी यादव (२१) असे या मुलीचे नाव आहे. जी तिचा भाऊ राहुल यादव याच्यासोबत एसआरए इमारतीत राहात होती. तो एका फार्मा कंपनीत काम करतो. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वर्षाने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली.या घटनेत ती गंभीर जखमी झाल्याने, स्थानिकांनी तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करविले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तिने मृत्युपूर्वी लिहिलेली कोणतीही सुसाइड नोट पोलिसांना सापडली नाही. त्यामुळे तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले? याची चौकशी पोलीस करत आहेत.
साकीनाक्यात सातमजली इमारतीवरुन तरुणीची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:22 IST