Join us
Daily Top 2Weekly Top 5

बायकोला फसवण्यासाठी मुलीची हत्या

By admin | Updated: February 27, 2016 02:24 IST

पोटगी मागणाऱ्या पहिल्या पत्नीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वत:च्या अवघ्या २५ दिवसांच्या मुलीची हत्या करणाऱ्या पित्याला वालीव पोलिसांनी काही तासांतच अटक केली.

वसई : पोटगी मागणाऱ्या पहिल्या पत्नीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वत:च्या अवघ्या २५ दिवसांच्या मुलीची हत्या करणाऱ्या पित्याला वालीव पोलिसांनी काही तासांतच अटक केली.नितीन चव्हाण असे त्याचे नाव आहे. नवजीवन वसाहतीत राहणाऱ्या नितीनचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर तिने पोटगीसाठी तगादा लावला होता. नितीनने दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या बायकोपासून त्याला एक २५ दिवसांची मुलगी (परी) आहे. पोटगीसाठी पहिल्या बायकोपासून सुटका करून घेण्यासाठी नितीनने स्वत:च्या मुलीचा खून करून तो आळ पहिल्या पत्नीवर टाकण्याचा कट रचला होता. गुरुवारी नितीनने छोट्या मुलीला उशीच्या अभ्य्रामध्ये घालून एका विहिरीत टाकले होते. त्यानंतर वालीव पोलीस ठाण्यात जाऊन परीचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली होती. त्याचवेळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विहिरीत एका लहान मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. अभ्य्रावरून पोलिसांनी नितीनचे घर गाठले तेव्हा बायकोने परीला ओळखले. त्यानंतर नितीनने गुन्ह्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)