Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनी बलात्कार प्रकरणी वाहकाला अटक

By admin | Updated: August 17, 2015 01:01 IST

मालाड पूर्व परिसरात राहणाऱ्या एका तीन वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी तिला शाळेत नेऊन सोडणाऱ्या खासगी वाहनाच्या

मुंबई : मालाड पूर्व परिसरात राहणाऱ्या एका तीन वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी तिला शाळेत नेऊन सोडणाऱ्या खासगी वाहनाच्या १९ वर्षीय वाहकाला कुरार पोलिसांनी रविवारी अटक केली.रोहित ऊर्फ अरविंद दुबे असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे. तो मालाड पूर्वच्या वायशेतपाडा परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबेला या मुलीने ओळखले आहे. तिने पालकांना होणाऱ्या त्रासाबद्दल जेव्हा सांगितले, तेव्हा तुला कोणी त्रास दिला असे त्यांनी मुलीला विचारले. तेव्हा या मुलीने ‘वो अंकल’ इतकेच आईवडिलांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तिला शाळेत सोडणाऱ्या खासगी वाहनाचा चालक आणि वाहकाला ताब्यात घेतले. वाहक दुबेला पाहताच या मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. (प्रतिनिधी)