Join us
Daily Top 2Weekly Top 5

आई ओरडल्याच्या रागात मुलाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 02:34 IST

आईसोबत झालेल्या भांडणानंतर नीलेश गुप्ता (१८) या मुलाने सोमवारी गळफास घेत आयुष्य संपविले. याबाबत अंबोली पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

मुंबई : आईसोबत झालेल्या भांडणानंतर नीलेश गुप्ता (१८) या मुलाने सोमवारी गळफास घेत आयुष्य संपविले. याबाबत अंबोली पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.अंबोलीत आई, वडील व लहान बहिणीसह नीलेश राहत होता. त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. निकालाची प्रतीक्षा करत, तो सुट्टी एन्जॉय करत होता. त्याने घरच्या कामात थोडी मदत करावी, असे त्याच्या आईचे म्हणणे होते. यावरून त्यांच्यात सतत खटके उडत असत. सोमवारीदेखील त्यांच्यात वाद झाला. नीलेश आईवर रागावला. रात्री काही कामानिमित्त आई व बहीण घराबाहेर गेली असता, नीलेशने दरवाजा लावून घेतला. त्यानंतर, साडीच्या सहाय्याने पंख्याला टांगून गळफास घेतला. या प्रकरणी सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नीलेशच्या मित्रांकडे चौकशी करत आहोत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले.