मुंबई : कुलाब्यात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर शनिवारी रे रोड येथील एका बंद शौचालयात बलात्कार झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. कुलाबा पोलिसांनी याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा नोंद करत शैबाज (२०) आणि इरशाद (१८) या आरोपींना अटक केली. परिसरात राहणाऱ्या दोन्ही आरोपींनी पीडित मुलीशी असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन तिला टॅक्सीत बसवले. रात्री आठच्या सुमारास रे रोड येथे आणल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला. घरी आल्यावर मुलीने सर्व हकीकत आईला सांगितली. (प्रतिनिधी)
कुलाब्यातील मुलीवर बलात्कार
By admin | Updated: March 23, 2015 02:07 IST