Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला अटक

By admin | Updated: April 3, 2015 03:06 IST

कोपरी येथे राहणाऱ्या चौदा वर्षीय मुलीवर पित्यासह भावाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी पित्याला

नवी मुंबई : कोपरी येथे राहणाऱ्या चौदा वर्षीय मुलीवर पित्यासह भावाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी पित्याला अटक केली असून, अल्पवयीन भावांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.कोपरी येथे राहणाऱ्या चौदा वर्षीय मुलीवर तिचे वडील तसेच दोन भाऊ अनेक दिवसांपासून लैंगिक अत्याचार करत होते. त्यांच्या अशा कृत्यामुळे भयभीत झालेल्या मुलीची रात्रीची झोप उडाली. यामुळे दिवसा शाळेत ही पीडित मुलगी झोपू लागल्याने शाळेच्या शिक्षिकेच्या प्रयत्नाने तिच्यावर होणारा अत्याचार उघड झाला. त्यानुसार याप्रकरणी बुधवारी रात्री एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रामनरेश मिश्रा असे तिच्या वडिलाचे नाव असून दोन भाऊ अल्पवयीन आहेत. होणाऱ्या अत्याचाराची वाच्यता बाहेर कोणाकडे होऊ नये याकरिता रामनरेश हा तिला घराबाहेर पाठवत नव्हता. तरीही ३० मार्च रोजी ती घराबाहेर खेळायला गेली असता रामनरेश याने तिला बेदम मारहाण केली. त्यामुळे पीडित मुलगी ३१ तारखेच्या परीक्षेला मुकली. पित्याचे कृत्य पाहून तिचे भाऊ देखील बहिणीवर अत्याचार करायचे. याप्रकरणी तिघांनाही अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी सांगितले. न्यायालयाने त्यांना ६ एप्रिलपर्यंतची कोठडी मिळाली आहे, तर दोन भावांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.(प्रतिनिधी)