ठाणो : ठाणो व पालघर जिल्हा परिषदांसह त्या अंतर्गत येणा:या 13 पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारी महिन्यात पार पाडण्यासाठी जिल्हा पातळीवर जोरदार तयारी सुरू आहेत. यासाठीची पूर्व तयारी म्हणून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांचे जात पडताळणी दावे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले जात आहेत.
ठाणो जिल्ह्यातील ठाणो व उल्हासनगर हे शहरी तालुके वगळता कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी या पाच तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या गटांसह पंचायत समित्यांच्या गणांमध्ये 31 जानेवारी 2क्15र्पयत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवणुकीसाठी इच्छुक असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी उमेदवारी अर्जासह जात वैधता प्रमाणपत्र जोडणो अपेक्षित आहे. यासाठी ठराविक कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. तोर्पयत जात वैधताप्रमाणपत्र मिळवता यावे यासाठी जात पडताळीचे दावे संबंधीत तालुक्यांमध्ये स्वीकारले जात आहेत. ठाणो जिप तिच्या नियंत्रणातील पाच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका बरखास्तीनंतर सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणो आवश्यक आहेत. त्यामुळे या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासन आधीच कामाला लागले आहेत. जात पडताळणी दावे दाखल करण्याचे आवाहन इच्छुक उमेदवारांना करण्यात येत आहे. प्रशासन जिप निवडणुकांसाठी सज्ज होता आहे, (प्रतिनिधी)
च्राज्य शासनाने ठाणो जिल्ह्याचे विभाजन करून ठाणो व पालघर या दोन जिल्ह्यांची निर्मिती केली आहे. त्यामुळे मुळची ठाणो जिल्हा परिषद बरखास्त करण्यात आली आहे. या जिल्हा परिषदेचा कारभार सध्या मुख्य कार्यकारी अधिका:यांच्या नियंत्रणात सुरू आहे.
च्जिल्हा परिषदेवर जास्त काळ प्रशासक ठेवणो लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे बरखास्तीपासून सहा महिन्यांत निवडणुका घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.