Join us
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांना मिळणार पाडव्याची भेट

By admin | Updated: March 27, 2017 04:26 IST

शाळांनी सामावून न घेतलेल्या अतिरिक्त शिक्षकांना अखेर दिलासा मिळणार आहे.

मुंबई :  शाळांनी सामावून न घेतलेल्या अतिरिक्त शिक्षकांना अखेर दिलासा मिळणार आहे. शाळांनी सामावून न घेतल्याने शिक्षकांचे वेतनही वेतन पथकाने अडविले होते. मात्र संबंधित अतिरिक्त शिक्षकांना त्यांची थकबाकीची रक्कम १ एप्रिल रोजी होणाऱ्या वेतनासोबत मिळणार आहे. अतिरिक्त शिक्षकांना प्रशासनाकडून मिळालेली ही गुढीपाडव्याची भेट मानली जात आहे. पुढील महिन्यात ही थकीत रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे निरीक्षक कार्यालयाने सांगितले आहे. त्यामुळे डिसेंबर २०१६ व जानेवारी २०१७ या दोन महिन्यांची वेतन थकबाकीची रक्कम मार्च महिन्याच्या वेतनासोबत जमा होईल. (प्रतिनिधी)