Join us  

दंड वसूल केल्यानंतर नागरिकांना मास्कची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 1:23 AM

जी उत्तर विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनापासून बचावासाठी अन्य उपाय योजनांबरोबरच तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर महापालिकेने बंधनकारक केला आहे. तसेच नियम मोडणाऱ्यांना कारवाईचा दंडुकाही दाखवण्यात आला. तरीही दंड भरल्यानंतरदेखील नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे आता दंडाबरोबरच संबंधित व्यक्तीला मास्क भेट देण्याचा उपक्रम ‘जी उत्तर’ विभागाने सुरू केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्यापासून तोंडाला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले. संसर्ग टाळण्यासाठी ‘एक वचन तीन नियम’ तोंडाला मास्क लावणे, हात धुणे, अंतर ठेवा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. गेल्या मंगळवारपासून सुरू करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत असे संदेश असलेले ७०० होर्डिंग संपूर्ण मुंबईत लावण्यात येणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाºया लोकांवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

एप्रिल ते आॅगस्टपर्यंत दोन हजार ७९८ नागरिकांकडून एक हजार रुपयांप्रमाणे २७ लाख ४८ हजार ७०० एवढा दंड पालिकेने वसूल केला होता. दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरुन दोनशे रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे १३ ते १९ सप्टेंबर या कालावधीत तीन हजार ६१५ लोकांना विनामास्क पकडण्यात आले. त्यांच्याकडून सात लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. मात्र दंड देऊन लोकं निघून जातात. अशा लोकांना मास्क भेट देऊन त्यांना मास्क लावण्याचे महत्व जी उत्तर विभागातील पथकामार्फत दादर, धारावी, माहीम या ठिकाणी सांगितले जात आहे.एप्रिल ते आॅगस्टपर्यंत दोन हजार ७९८ नागरिकांकडून एक हजार रुपयांप्रमाणे २७ लाख ४८ हजार ७०० एवढा दंड पालिकेने वसूल केला होता. १३ ते १९ सप्टेंबर या कालावधीत तीन हजार ६१५ लोकांना विनामास्क पकडण्यात आले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस