Join us

घाटकोपरचा मुख्य रस्ता खड्डय़ात

By admin | Updated: November 2, 2014 00:40 IST

पालिकेच्या बेपर्वाईचा भरुदड घाटकोपर येथील रहिवाशांना गेली पाच वर्षे सहन करावा लागत आह़े

मुंबई : पालिकेच्या बेपर्वाईचा भरुदड घाटकोपर येथील रहिवाशांना गेली पाच वर्षे सहन करावा लागत आह़े पूर्व उपनगरातील महत्त्वाच्या गोळीबार मार्गावर सवरेदय रुग्णालय ते जगदुशा नगर हा एक कि़मी़चा पट्टा खड्डय़ात असल्याने वाहनचालक व पादचा:यांचेही हाल होत आहेत़
घाटकोपरमधील औद्योगिक वसाहतींना जोडणारा तसेच जगदुशा नगर, अमृत नगर, गिल्डर नगर आणि रायफल रेंज नगरला हा रस्ता जोडतो़ प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्याची अधिकच दुरवस्था होत चालली आह़े मात्र स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेने याकडे कानाडोळाच केलेला आह़े खड्डय़ात गेलेल्या या रस्त्यांमुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांचे पाठीचे दुखणो बळावले आह़े गणोशोत्सवाच्या काळात या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होत़े परंतु पुन्हा काही दिवसांनी हा रस्ता खड्डय़ात गेला आह़े मेट्रो पुलाखालून जाणा:या रस्त्याचीही अशीच दुरवस्था झाली आह़े (प्रतिनिधी)