Join us

ऐश्वर्यामुळे घाटकोपरमध्ये दोन तास वाहतूककोंडी !

By admin | Updated: November 9, 2014 00:54 IST

एका ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटनासाठी घाटकोपरमध्ये आलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला बघण्यासाठी गर्दी उसळली आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला.

मुंबई : एका ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटनासाठी घाटकोपरमध्ये आलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला बघण्यासाठी गर्दी उसळली आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला. तब्बल दोन तास घाटकोपर पूर्वेकडील रेल्वे स्थानकानजीकच्या रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. यामुळे बेस्ट बस, रिक्षा आणि खासगी वाहने जागच्या जागीच थांबली.
एका बडय़ा ज्वेलरी शॉपने घाटकोपर पूर्वेकडील पालिकेच्या एन वॉर्डशेजारी शाखा उघडली. उद्घाटनासाठी ऐश्वर्या येणार अशी जाहिरातही केली. ठरल्याप्रमाणो ऐश्वर्या दुपारी तीनच्या सुमारास अपेक्षित होती. मात्र बघ्यांची गर्दी दुपारी एक वाजल्यापासूनच जमू लागली. ऐश्वर्याला पाहता यावे यासाठी बघ्यांनी दुकानासमोरील रेल्वेचा स्कायवॉकही व्यापला. रेल्वेच्या संरक्षक भिंतीवरही गर्दी उसळली. त्यामुळे वाहतूक तुंबली. गर्दी पांगविण्यासाठी पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दी पांगविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी चित्र देखणो यांनी दिली. पोलिसांनी मात्र वाहतूककोंडी झाली नसल्याचा दावा केला. (प्रतिनिधी)