Join us  

केवळ दोन क्लिकवर मिळवा रेल्वेचे तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 3:56 AM

रेल्वे प्रवाशांना आता दोनदा क्लिक करून रेल्वेचे तिकीट मिळेल.

मुंबई : रेल्वे प्रवाशांना आता दोनदा क्लिक करून रेल्वेचे तिकीट मिळेल. यासाठी एटीव्हीएमवर ‘हॉट की’ बसविण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील एकूण ४२ स्थानकांवर ९२ एटीव्हीएम बसविण्यात येतील.

येत्या दोन दिवसांत ‘हॉट की’ सुविधा एटीव्हीएम यंत्रणेत बसविण्यात येईल. एटीव्हीएमच्या तुलनेत ही नवीन एटीव्हीएम अधिक सोपी आणि फायद्याची ठरेल, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाला आहे. सध्या स्थानकावर असलेल्या एटीव्हीएममधून तिकीट काढण्यासाठी सहा वेळा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात. मात्र, नव्या मशीनमध्ये दोनदा पर्याय निवडून तिकीट मिळेल.

एटीव्हीएमच्या नव्या रूपात कसारा-खोपोली दिशेकडील आणि सीएसएमटी दिशेकडील असे दोन पर्याय दिसतील. त्यानंतर, प्रवाशांना मार्ग व इच्छित स्थानक निवडून तिकीट मिळेल.

टॅग्स :भारतीय रेल्वेतिकिट