Join us

रिक्षाचालकाला अटक करा!

By admin | Updated: March 4, 2015 02:04 IST

रिक्षाचालकाच्या अश्लील हावभावांमुळे भेदरलेल्या दोन तरु णींनी भरधाव रिक्षातून उडी घेतल्याची घटना ठाण्यात रविवारी रात्री घडली.

ठाणे : रिक्षाचालकाच्या अश्लील हावभावांमुळे भेदरलेल्या दोन तरु णींनी भरधाव रिक्षातून उडी घेतल्याची घटना ठाण्यात रविवारी रात्री घडली. या प्रकरणी फुलचंद गुप्ता (४३) या ढोकाळीच्या रिक्षाचालकाला संशयित म्हणून अटक करून, त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून जोर धरू लागली आहे.राज्य महिला आयोगाच्या सदस्य आणि मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी घटनास्थळाला भेट दिली. ठाण्यातील या प्रकारामुळे वाहतुकीचे नियम आणि पोलीस यंत्रणा यापैकी कशाचीही भीती नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यासाठी शिक्षा काय, याची चौकशी केली असता फक्त १०० रु पये दंड आहे, अशी माहिती मिळाली. यामुळे असे गुन्हे रोखण्यासाठी खरेतर परिवहन विभागाने पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्याकडे वाहन जप्त करण्याचेही अधिकार असतात. महिलांचा प्रवास सुरीक्षत व्हायलाच हवा. यासाठी ठाण्याचे पोलीस सहआयुक्त लक्ष्मी नारायण, ठाणे वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर आणि वागळे इस्टेट परिमंडळचे पोलीस उपायुक्त व्ही. व्ही. चंदनशिवे यांचीही त्यांनी भेट घेतली. तसेच या घटनेचा तपास अधिक वेगाने व्हावा, अशीही अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.शिव वाहतूक सेनेचा पुढाकारच्या घटनेत मुली बचावल्या असल्या तरी अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून रिक्षा चालकाविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेने सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्याकडे केलीआहे. तर खासदार राजन विचारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे़च्वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय देशमुख, सचिव समीर शेख,शहर सह सचिव प्रितम गोरे यांनी सह पोलीस आयुक्तांसह, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनाही हे निवेदन दिले.