कर्जत : नागरिक जागृत असतील आणि पोलिसांनी तत्परता दाखवली तर काहीही शक्य आहे. पनवेलमधून पळवून आणलेल्या एका तीन वर्षाच्या मुलाला पंधरा दिवसानंतर त्याची आई पुन्हा मिळाली. हे शक्य झाले कर्जतमधील एका जागृत नागरिकामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे. पनवेल पोलिसांनी त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असून आता तो मुलगा आईच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाच्या रुग्णवाहिकेवरील चालक दहिवली येथील चेतन साबळे व त्यांचे काही मित्न 31 जुलैच्या रात्री बारा-साडेबाराच्या दरम्यान कर्जत चार फाटा येथुन येत होते. त्यांना एक व्यक्ती संशयास्पद वाटला ते त्यांच्या जवळ गेले त्या इसमाकडे एक लहान मूल होते व तो व्यक्ती त्याला घेऊन आडोशाला झोपण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता तो हिंदी बोलत होता तर त्यांच्या जवळील तो लहान मुलगा मराठी बोलत होता. त्यामुळे त्यांना त्या व्यक्ती संशय आला. त्यांनी त्या व्यक्ती व मुलाला कर्जत पोलीस ठाण्यात आणले. तेथे डय़ुटीवर ठाणो अंमलदार सहाय्यक फौजदार बी.एम. जाधव होते. चेतन साबळे यांनी जाधव यांना सर्व घटना सांगितली. पोलिसांनी व्यक्तीची अधिक चौकशी केली असता, मी पंधरा दिवसापूर्वी या मुलाला गोवा येथील पेडणो गावातून पळवून आणले आहे असे सांगितले. त्यावर सहाय्यक फौजदार एस.एस. शेंबडे यांनी रात्नीच गोवा व पेडणो गावातील पोलीस यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ही व्यक्ती खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी खाक्यात दाखवताच हा मुलगा रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातून पळवून आणल्याचे समोर आले.
1 ऑगस्ट रोजी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.आर. पाटील यांच्या पथकाने ती व्यक्ती व मुलासह पनवेल गाठले आणि शोध घेतला. अखेर पनवेलमध्ये गेल्यावर मुलाने आईला ओळखले. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील चिंचवाडी येथे राहणा:या गीता प्रकाश चव्हाण यांचा तीन वर्षाचा उमेश प्रकाश चव्हाण याला नाजिम मशाक शेख (4क् रा. सांबा तालुका, गोलघुमट जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक) याने पंधरा दिवसापूर्वी पळवून नेले होते. उमेशची आई गीता प्रकाश चव्हाण यांनी पनवेल पोलीस ठाणो येथे नाजिम शेख याच्याविरु ध्द तक्र ार दाखल केली आहे. मूल पळविणारा नाजिम शेख हा सध्या पोलिसांच्या ताब्यात
आहे.