Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्व जागा स्वबळावर लढवण्यास सज्ज व्हा - उद्धव ठाकरेंचा आदेश

By admin | Updated: July 4, 2014 12:46 IST

भाजपच्या एकला चलो रे च्या भूमिकेला ठोस प्रत्युत्तर देण्याचे शिवसेनेने ठरवले असून विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागा स्वबळावर लढवण्याची तयारी ठेवा असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ४ - राज्यातील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या भाजपच्या भूमिकेला ठोस प्रत्युत्तर देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागा स्वबळावर लढवण्याची तयारी करा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून सर्व विभाग प्रमुखांना मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत राज्यात शिवसेना विरुद्ध भाजपा अशी जोरदार लढत पहायला मिळू शकेल.
भाजपा पदाधिकारी संमेलनादरम्यान राज्यभरातील पदाधिका-यांनी विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा सूर लावला. युतीत शिवसेनेला मोठ्या भावाची भूमिका दिली, पण त्यांनी कायम भाजपाची गळचेपी केली असे सांगत राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री हवा असेल, तर शिवसेनेसोबत फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवा, असा जोरदार आग्रह पदाधिका-यांनी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत धरला होता. 
भाजप नेत्यांच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले असतानाच शिवसेनेनेही आता आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.