Join us  

दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांकडून ३४ लाखांची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 1:25 AM

दररोजच्या गर्दीतून मुक्तता मिळण्यासाठी किंवा काही वेळा अनवधानाने सामान्य प्रवासी दिव्यांग डब्यातून प्रवास करतात.

मुंबई : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत दिव्यांग डब्यांतून प्रवास करणाºया १३ हजार ५४२ प्रवाशांवर कारवाई करून ३४ लाखांचा दंड रेल्वे प्रशासनाने वसूल केला. यासह तीन जणांना तुरुंगात कैद करण्यात आले आहे.दररोजच्या गर्दीतून मुक्तता मिळण्यासाठी किंवा काही वेळा अनवधानाने सामान्य प्रवासी दिव्यांग डब्यातून प्रवास करतात. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग डब्यात बसण्यासाठी जागा मिळत नाही. मध्य आणि हार्बर मार्गावरील धावणाºया लोकलच्या दिव्यांगाच्या डब्यातून सामान्य प्रवासी प्रवास करण्याच्या वारंवार तक्रार दाखल होत होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत कारवाई करून दंडाची वसुली केली.जानेवारी ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीत केलेल्या कारवाईत ठाणे स्थानक अव्वल आहे. त्यानंतर, दादर आणि तुर्भे या स्थानकांचा क्रमांक लागतो. ठाणे स्थानकात ३ हजार ८२३ प्रवाशांवर कारवाई करून ११ लाख १६ हजार ९०० रुपयांची दंडाची वसुली करण्यात आली आहे.दादर स्थानकात १ हजार ५३५ प्रवाशांवर कारवाई करून ३ लाख १ हजार ४३२ रुपयांची दंडाची वसुली केली. तुर्भे स्थानकात १ हजार ४८४ प्रवाशांवर कारवाई करून ४ लाख १८ हजार ५०० रुपयांची दंडाची वसुली केली.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील प्रत्येक स्थानकावर कारवाई करून जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १३ हजार ५४२ जणांवर कारवाई करून ३४ लाख ४ हजार ८३२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.अशी केली दंडवसुलीस्थानक कारवाई दंडझालेले (रुपये)प्रवासीकल्याण १, ३७९ ३,९०,९००घाटकोपर १,१२१ २,००,०१८कुर्ला ५१३ १,०१,८००मानखुर्द ४६५ ७५,५००वडाळा ३६६ ८०,७००डोंबिवली ३६५ १,५९,०००बदलापूर ३२८ ९५,२००मुलुंड २१८ ४३,६००दिवा १८८ ५४,३००कर्जत १८५ ५१,४००भायखळा १६१ २९,८००कसारा १३४ ३९,०००

टॅग्स :मुंबई लोकल