Join us  

सामान्यजनांची रुची राष्ट्रहिताचीच ठरेल, भारत-चीन युद्धाची सध्या शक्यता नाही, अनय जोगळेकर यांचे मत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 6:52 AM

युद्धाने कोणाचेही भले होणार नाही, हे चीनलाही माहीत आहे, त्यामुळे भारत-चीन युद्ध होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. सामान्यजनांनी रुची घेतल्याने देशाचे परराष्ट्र धोरण राष्ट्रहिताशी अधिक घट्टपणे जोडले जाऊ शकेल, असे मत परराष्ट्र व्यवहार अभ्यासक अनय जोगळेकर यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : युद्धाने कोणाचेही भले होणार नाही, हे चीनलाही माहीत आहे, त्यामुळे भारत-चीन युद्ध होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. सामान्यजनांनी रुची घेतल्याने देशाचे परराष्ट्र धोरण राष्ट्रहिताशी अधिक घट्टपणे जोडले जाऊ शकेल, असे मत परराष्ट्र व्यवहार अभ्यासक अनय जोगळेकर यांनी व्यक्त केले.विचार व्यासपीठातर्फे रविवारी सहयोग मंदिर येथे ‘भारतीय परराष्ट्रीय धोरण’ या विषयावर जोगळेकर यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले की, चीन नौदलात जे प्रकल्प राबवत आहे, त्याद्वारे चीन भारताला वेढू शकतो. नौदलाच्या दृष्टीने भारताने विचार करावा. कारण, भारताच्या संरक्षण बजेटपेक्षा चीनचे बजेट चौपट आहे. पाकिस्तानमधला दहशतवाद कोणी रोखू शकत नाही. ते आता पाकिस्तानच्याही हातात राहिले नाही. चीन पाकिस्तानात जे प्रकल्प राबवत आहे, ते फसले तर दहशतवादी हल्ले सुरू होऊन चीनला धोका निर्माण होऊ शकतो.अमेरिकेनेही पाकिस्तानमधील दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांनाही ते जमले नाही आणि पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले. चीनला पाकिस्तानमधील दहशतवादाचे भूत बाटलीत बंद करायचे झाले, तर कितपत जमेल, ही शंका जोगळेकर यांनी व्यक्त केली.सीमेची निश्चिती न झाल्यामुळे अनेकदा अनवधानाने भारत-चीन सीमेवर सैनिक एकमेकांच्या हद्दीत घुसतात आणि दुसºया बाजूने आक्षेप घेतल्यावर माघारी जातात. काही वर्षांपासून चिनी सैनिकांच्या हेतूपूर्ण घुसखोरीत वाढ झाली आहे. डोकलाममधील घुसखोरीचा उद्देश पंतप्रधान मोदींची प्रतिमाभंग करणे तसेच भूतानला भारतापासून वेगळे पाडून भविष्यात त्याच्याशी स्वतंत्र वाटाघाटी करण्याचा असावा, असा अंदाज आहे. एरव्ही, सीमाभागातील तणावाच्या प्रसंगांना अनुल्लेखाने मारणाºया चीनने डोकलाम प्रश्नावर खूप गाजावाजा केला. दुसरीकडे भारताने संयत, पण खंबीर भूमिका घेतली. डोकलाम प्रश्नाचा शेवट गोड झाला असला, तरी भविष्यात लवकरच त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असेही जोगळेकर म्हणाले.

टॅग्स :भारतचीन