Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटातून जेनेलिया बचावली

By admin | Updated: August 19, 2015 01:28 IST

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सोमवारी रात्री झालेल्या बॉम्बस्फोटातून अभिनेता रितेश देशमुख याची अभिनेत्री पत्नी जेनेलिया डिसोझा अगदी

मुंबई : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सोमवारी रात्री झालेल्या बॉम्बस्फोटातून अभिनेता रितेश देशमुख याची अभिनेत्री पत्नी जेनेलिया डिसोझा अगदी थोडक्यात बचावली आहे. स्फोटाच्या ठिकाणाजवळच्या एका मॉलमध्ये जेनेलिया गेली होती. स्फोटाच्या काही वेळ आधीच ती कारमध्ये येऊन बसली होती. स्फोटाचा आवाज आणि हादराही तिने अनुभवला.रितेश देशमुखही या वेळी बँकॉकमध्येच होता. परंतु, तो जेनेलियासोबत नव्हता. दोघांनीही ते सुखरूप असल्याची बातमी लगेचच सर्वांना दिली. रितेशने टिष्ट्वट करूनही त्यांची खुशाली कळवली. आम्ही नशीबवान म्हणून सुरक्षित राहिलो, असे रितेशने म्हटले आहे. अजूनही देशमुख दाम्पत्य बँकॉकमध्येच आहे. रितेशला हाऊसफुल ३ च्या शुटिंगसाठी लंडनला जायचे आहे. परंतु, तत्पूर्वी तो जेनेलियासह सुटीसाठी बँकॉकमध्ये गेला आहे.