Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘जेंडर बजेट सेल १५ नोव्हेंबरपर्यंत स्थापन करा’, अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 06:31 IST

मुंबई : प्रत्येक विभागात महिला आणि बालकांसाठी असलेल्या योजनांसाठी किती निधी उपलब्ध करून दिला जातो व दिलेला निधी किती गुणवत्तापूर्ण पद्धतीने खर्च केला जातो

मुंबई : प्रत्येक विभागात महिला आणि बालकांसाठी असलेल्या योजनांसाठी किती निधी उपलब्ध करून दिला जातो व दिलेला निधी किती गुणवत्तापूर्ण पद्धतीने खर्च केला जातो, या योजनांचा लाभ ख-या अर्थाने महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी होतो का?, हे पाहण्यासाठी नियोजन विभागात जेंडर बजेट सेलची स्थापना १५ नोव्हेंबरपर्यंत केली जावी, असे निर्देश सोमवारी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुनगंटीवार म्हणाले की, जेंडर बजेट स्टेटमेंट केल्याने केवळ निधीच्या रकमा बदलायला नको तर त्यामुळे खरच महिला आणि बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला का?, महिला सक्षम झाल्या का? हे पाहणेही तितकेच गरजेचे आहे. इतर राज्यातील जेंडर बजेट सेलचा अभ्यास करून त्याची माहिती पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.