Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पाकिझा’फेम गीता कपूर वृद्धाश्रमात

By admin | Updated: June 2, 2017 03:51 IST

रुग्णालयात खितपत पडलेल्या ‘पाकिझा’ चित्रपटातील अभिनेत्री गीता कपूर यांना गुरुवारी वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले. चित्रपट

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रुग्णालयात खितपत पडलेल्या ‘पाकिझा’ चित्रपटातील अभिनेत्री गीता कपूर यांना गुरुवारी वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले. चित्रपट दिग्दर्शक तसेच सेंट्रल बोर्ड फिल्म सर्टिफिकेशनचे सदस्य अशोक पंडित आणि अर्चना सुरी तसेच या क्षेत्रातील काही नावाजलेल्या मंडळींनी याकामी पुढाकार घेतला.गीता कपूर यांना गोरेगावच्या एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारांचे लाखो रुपयांचे बिल झाल्यामुळे कोरिओग्राफर असलेला त्यांचा मुलगा राजा हा त्यांना तेथेच सोडून पळून गेला. एकूण बिलापैकी पंडित यांनी ८० हजार तर उर्वरित रक्कम अर्चना सुरी ंयांनी भरली. गुरुवारी गीता यांना अंबोली परिसरातील ‘जीवन आशा ओल्डेज होम’ वृद्धाश्रमात हलविण्यात आले. पंडित आणि सुरी यांनी या ठिकाणची कपूर यांची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. गीता कपूर यांची हवाईसुंदरी असलेली मुलगी पूजा हिनेदेखील आईला ओळख दाखविण्यास नकार दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राजा हा चार चार दिवस मला उपाशी ठेवायचा, मारहाण करायचा, जेणेकरून मी वृद्धाश्रमात निघून जावे, असे गीता यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या प्रकरणी राजाविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.