Join us

गवळी समाजाला मिळाले सुसज्ज समाज कल्याण मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर मुंबईतील गवळी समाजासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या खासदार निधीतून आणि त्यांच्या संकल्पनेतून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उत्तर मुंबईतील गवळी समाजासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या खासदार निधीतून आणि त्यांच्या संकल्पनेतून कांदिवली पश्चिम,चारकोप सेक्टर ९ येथे बांधण्यात आलेल्या समाज मंदिरचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. यावेळी गवळी समाजातील जवळपास १२०० बांधव उपस्थित होते. खासदार गोपाळ शेट्टी यांनी गवळी समाजाने यापुढेही चांगले उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पश्चिम विभागीय गवळी समाजाचे अध्यक्ष अनंत भालेकर यांनी खासदार शेट्टी यांचा सत्कार केला. या समाज मंदिराचा उपयोग गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता होईल तसेच येथे सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम घेता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. गवळी समाजासाठी एका लोकप्रतिनिधीकडून चांगली सोय मिळाल्याचे संतुष्टी भाव त्यांनी व्यक्त केले.

-----------------------------------------