Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुडापोटी गुन्ह्यात गोवले - चौगुले

By admin | Updated: June 7, 2015 00:14 IST

आपल्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली आहे.

नवी मुंबई : आपल्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केली आहे. केवळ राजकीय सुडापोटी पोलिसांच्या मदतीने हा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे राज्यात वडार समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात समाजातर्फे १० जूनला मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.शिवसेनेचे महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यावर १६ डिसेंबर २०१४ रोजी सीबीडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणामुळेच त्यांना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. राजकीय सुडापोटी आपल्याला या गुन्ह्यात गुंतवले गेल्याचे चौगुले यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणूक पूर्वीपासून संबंधितांचे त्यासाठी प्रयत्न सुरू होते, असेही त्यांनी वाशी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तक्रारदार तरुणी कोपरखैरणेची राहणारी असून तिचा खारघरला फ्लॅट आहे. हा फ्लॅट चौगुले यांनीच दिलेला आहे. त्यामुळे कोणताही संबंध नसलेल्या सीबीडी पोलीस ठाण्यातच तक्रार का दाखल झाली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी विरोधकांच्या या सुडामध्ये सीबीडी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहभागी असून, त्यात आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारदार मुलगी तिच्या मर्जीने सोबत फिरायला येत असे. शिवाय घरगुती कार्यक्रमांमध्येही तिचा सहभाग असायचा. या सर्व बाबींचे पुरावे असल्यामुळेच आपल्याला जामीन मंजूर झालेला आहे. अन्यथा आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न विरोधकांनी केला असेही ते म्हणाले. या प्रकरणात तानजी सुर्वे यांना चौगुलेंचा सहआरोपी केलेले आहे. मात्र न्यायालयात जाताना अडवून पोलिसांनी त्यांच्यावरही खोटा गुन्हा दाखल केल्याचाही आरोप चौगुले यांनी केला. तर तरुणीचे आरोप खोटे असल्याचे पुरावे देऊनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या सगळ््याची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी वडार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.(प्रतिनिधी)