Join us
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीत दहा हजारांचा गुटखा जप्त

By admin | Updated: April 8, 2015 22:32 IST

गुटखा विक्रीस शासनाची बंदी असताना खोपोलीत चोरीच्या मार्गाने पानटपरीवर गुटखा विक्री केली जात आहे. याबाबतची माहिती स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखा

वावोशी : गुटखा विक्रीस शासनाची बंदी असताना खोपोलीत चोरीच्या मार्गाने पानटपरीवर गुटखा विक्री केली जात आहे. याबाबतची माहिती स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांना लागताच बुधवारी त्यांनी झाडाझडती केली असताना ७८ हजार ७०० रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे.शासनाची गुटखा विक्रीस बंदी असताना कोल्हापुरी गुटखा, केसरयुक्त विमल गुटखा व गोवा गुटखा यांची विक्री खोपोलीत होत असल्याची माहिती स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखेचे पोसई पाटील यांना लागताच त्यांच्या पथकाने आरोपी रशीद अहमद इब्राहिम (३४) रा. पटेलनगर, खोपोली यांच्या स्वत:च्या घरामध्ये गोण्यामध्ये भरून साठा क रून ठेवल्याचे निदर्शनास आले. कोल्हापुरी गुटखा १२०० रु., गोवा गुटखा ५०० रु., केसरयुक्त विमल गुटखा ६० हजार रुपये असा एकूण ७८ हजार ७०० रुपये किमतीचा गुटखा स्थानीय गुन्हे शाखा यांनी खोपोली पोलिसांच्या सहाय्याने पकडला आहे. (वार्ताहर)