Join us  

गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 3:30 AM

पाऊस ओसरला असला तरीही साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात गेल्या तीन महिन्यांत गॅस्ट्रोचे २ हजार २४४ रुग्ण मुंबई शहर-उपनगरात आढळल्याची नोंद आहे.

मुंबई  - पाऊस ओसरला असला तरीही साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात गेल्या तीन महिन्यांत गॅस्ट्रोचे २ हजार २४४ रुग्ण मुंबई शहर-उपनगरात आढळल्याची नोंद आहे. गॅस्ट्रोची लागण होण्याकरिता दूषित पाणी हे प्रमुख कारण असल्याने मुंबईकरांना पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात गॅस्ट्रोचे ७७९ रुग्ण, जुलै महिन्यात १ हजार ८९ रुग्ण, तर आॅगस्ट महिन्याच्या पंधरवड्यात ३७६ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, आॅगस्टच्या पंधरवड्यात ई विभागात २, तर एफएन विभागात एक अशा प्रकारे तीन कॉलराचे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा या साथीच्या आजारांचे प्रमाण कमी असले तरीही पाऊस नसतानाही लागण होणे थांबलेले नाही. आॅगस्टच्या पंधरवड्यात मलेरियाचे ४१५ रुग्ण, लेप्टोचे २८ रुग्ण, डेंग्यूचे ७९ , हेपेटायटिसचे ८१ रुग्ण आढळून आले आहेत.त्याशिवाय, डेंग्यूसदृश आजाराचे या पंधरवड्यात १ हजार १८३ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर पालिकेच्या विविध रुग्णालये, दवाखान्यांत उपचार सुरू आहेत. या पंधरवड्यात लेप्टोमुळे गेलेल्या एका बळीनंतर नजीकच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली.पाणी उकळून प्याखबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी उकळून व थंड करून प्यावे. तसेच गॅस्ट्रोची काही लक्षणे दिसल्यास त्वरित जवळील दवाखान्यात संपर्क साधावा, असे डॉ. कार्तिक भालेराव यांनी सांगितले.गॅस्ट्रोची लक्षणे : उलटी होणे, मळमळणे, पोट दुखणे, अशक्तपणा जाणवणे आदी लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. औषधोपचार सुरू करावेत.

टॅग्स :मुंबईआरोग्य