Join us

कळंभई आश्रमशाळेत गॅस्ट्रोची साथ

By admin | Updated: July 3, 2015 22:25 IST

दूषित पाणी प्यायल्याने वाडा तालुक्यातील कळंभई आश्रमशाळेत गॅस्ट्रोची साथ उद्भवली असून त्याचा त्रास २६ विद्यार्थ्यांना झाला असून त्यांच्यावर खानिवली प्राथमिक

वाडा : दूषित पाणी प्यायल्याने वाडा तालुक्यातील कळंभई आश्रमशाळेत गॅस्ट्रोची साथ उद्भवली असून त्याचा त्रास २६ विद्यार्थ्यांना झाला असून त्यांच्यावर खानिवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.ऋणाली तोताडे (१४), योगिता वळवी (१२), ऊर्मिला धिंडा (१२), रुचिता वळवी (१५), सरिता पागी (१६) व कलावती अंधेर (६) अशी दवखान्यात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार वाडा तालुक्यातील कळंभई येथे आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेतील सुमारे २६ विद्यार्थ्यांच्या पोटात शुक्रवारी (दि. ३) सकाळी दुखू लागले. उलट्या व जुलाब चालू झाल्याने २६ विद्यार्थ्यांना खानिवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप इंगळे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून सहा विद्यार्थिनींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून घेतले व उर्वरित विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत पुन्हा पाठविले.दूषित पाणी प्यायल्याने हा प्रकार उद्भवला असावा, असा अंदाज पालकांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)