मुंबई : चेंबूरच्या गडकरी खाण परिसरातील एका गॅरेजमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास या स्फोटाचा कानठळ्या बसविणारा आवाज परिसरातील रहिवाशांनी ऐकला. या स्फोटात गॅरेज मॅकेनिक व टँकरचा क्लीनर जागीच ठार झाले. स्फोट झालेला टँकर रिकामा असल्याने मोठ्या प्रमाणावर होऊ घातलेली जीवित व वित्तहानी टळली, अशी माहिती पोलीस देतात.चेंबूरच्या गडकरी खाण परिसरातील मिश्रा कम्पाउंडमधील एका गॅरेजमध्ये सकाळी एमएच ०४-एफपी ३५२१ क्रमांकाचा गॅस टँकर वेल्डिंगसाठी येऊन उभा राहिला. या कामाला अवकाश असल्याने चालक टँकर तेथेच उभा करून घरी निघून गेला. तर त्याचा क्लीनर रफिक शेख (२६) तेथेच थांबून मेकॅनिक शफिक खानकडून (१८) वेल्डिंग करून घेत होता. वेल्डिंग करताना टँकरची झाकणे बंद होती. त्यामुळे वेल्डींग करतानाचा धूर टँकरमध्ये जमा झाला. टँकर रिकामा असला तरी त्यात शुल्लक प्रमाणात गॅस होता त्यामुळे धूरामुळे गॅसने पेट घेतला. झाकणे बंद असल्याने टँकर फुटला.हा स्फोट इतका भीषण होता की शेख आणि खान यांचा गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाच्या आवाजाने दूरवरील निवासी वस्त्यांमधील घरांच्या व रस्त्यावरील वाहनांच्या काचा फुटल्या. टँकरचे दोन तुकडे झाले. मागील भाग प्रचंड वेगाने टाटा पॉवर कंपनीच्या फीडरमध्ये जाऊन धडकला. या स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील रहिवाशांनी तत्काळ गॅरेजच्या दिशेने धाव घेतली. यावेळी दोन्ही तरुण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले होते. रहिवाशांनी त्यांना तत्काळ एका खागगी गाडीत घालून सायन रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला. तर या घटनेत टँकरचे काही तुकडे डोक्यावर पडल्याने तीन जण जखमी झाले आहे. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.हा टँकर भरलेला असता आणि त्याचा स्फोट झाला असता तर मोठी जिवीत व वित्त हानी झाली असती, असा अंदाज पोलिसांनी वतर्विला या गॅरेजपासून काही अंतरावरच हिन्दुस्थान पेट्रोलियमचा तेलशुद्धीकरण प्रकल्प व गॅस सिलिंडरचा प्रकल्प आहे. याशिवाय अन्यही कारखाने आहेत. भरलेल्या टँकर फुटला असता तर या प्रकल्पांनाही त्याचा फटका बसला असता, असे पोलीस सांगतात.बॉम्बस्फोटा सारखा आवाजहा स्फोट इतका भयंकर होता की या टँकरचे काही सेंकदामध्येच दोन तुकडे झाले. यातील एक तुकडा दीडशे फुट वर उडून टाटा पॉवरच्या तारांमध्ये आटकला. त्यामुळे या तारा देखील तुटण्याच्या अवस्थेत आहेत. तसेच टँकरच्या काही भागांचे तुकडे या गॅरेजजवळ असलेल्या काही घरांवर जाउन उडाले. त्यामुळे परिसरातील अनेक घरांचे पत्रे तुटले असून काही वाहनांच्या काचा ही फुटल्या आहेत. घटनास्थळाची माहिती मिळताच आरसीएफ पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब स्कॉड आणि एटीएसचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पाहणी केल्यानंतर आरसीएफ पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.दोन वर्षांतील तिसरी घटनाचेंबूरच्या या गडकरी खाण आणि माहूल गाव याठिकाणी भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम अणि ऐजिस या सारख्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून दररोज देशातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि गॅसचा पुरवठा केला जातो. त्यामुळे दिवसरात्र याठिकाणी अनेक टँकर उभे असताता. या कंपन्या दररोज करोडो रुपयांचा व्यवसाय करतात. मात्र कंपन्यांकडून टँकर उभे करण्यासाठी पार्कींगची सुविधाच नाही. त्यामुळे सर्व टँकर रस्त्यांच्या कडेलाच उभे केले जातात. त्यामुळे गेल्या दोन वर्षातील अशा प्रकारची ही तिसरी घटना घडली असल्याची माहिती एका रहिवाशाने दिली आहे. टाटाचे युद्धपातळीवर प्रयत्न- चेंबूर येथे झालेल्या टँकर स्फोटात वीज पुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीच्या फिडरलाही आग लागली. मुंबईकरांना सुरक्षेती वीज देता यासाठी कंपनी नेहमीच तत्पर असते. त्यामुळेच या स्फोटानंतर कंपनीने तात्काळ फिडरच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले व ते मंगळवारी रात्री उशिरापर्यंत संपण्याची अपेक्षा होती.
चेंबूरमध्ये गॅस टँकरचा स्फोट
By admin | Updated: May 20, 2015 02:44 IST