Join us  

‘वायू’ गुजरातकडे सरकले; मुंबई, कोकण किनारपट्टीवर कोसळधारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 3:06 AM

हवामान विभागाचा अंदाज; चक्रीवादळ उद्या गुजरातच्या किनाऱ्यावर

मुंबई : वायू चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असतानाच मुंबईसह कोकणात पाऊस पडेल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. चक्रीवादळ पुढे सरकत असताना पोरबंदर, महुआ, वेरावल आणि दिव येथे चक्रीवादळामुळे तुफान पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतासह पाकिस्तानलाही चक्रीवादळाचा फटका बसणार असून, दुसरीकडे कर्नाटकच्या सीमेवर दाखल झालेला मान्सून अद्याप पुढे सरकलेला नाही.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती.विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.चक्रीवादळाचा परिणामअरबी समुद्रातील वायू या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून रविवारी आणि सोमवारी मुंबई महानगर प्रदेशात ऐन रात्री पाऊस पडला आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी रात्री मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस झाला. मंगळवारी दुपारी नवी मुंबईत पावसाची नोंद झाली असून, पूर्व आणि पश्चिम उपनगरातही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट१२ आणि १३ जून : विदर्भात काही ठिकाणी तसेच मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.मुंबईसाठी अंदाज१२ जून : दुपारी आकाश ढगाळ राहील. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे.पावसाचा इशारा१२ जून : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१३ ते १४ जून : कोकण, गोव्यात बºयाच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१५ जून : कोकण, गोव्यात बºयाच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

टॅग्स :मुंबईगुजरातमानसून स्पेशल